सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांना सर्वतोपरी सहकार्य करणार मुख्यमंत्री शिंदे यांचा उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्याकडून सत्कार
करमाळा प्रतिनिधी अडीच वर्षाच्या काळात सत्तेच्या माध्यमातून कोणताही फायदा शिवसैनिकाला तथा शिवसेना मजबुती करण्यासाठी झाला नाही. मात्र येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेसाठी
व शिवसैनिकांना मोठी ताकद देऊ तसेच सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी अद्याप जिल्हा वासियांना यांना मिळालेले नसताना हे पाणी पुणे जिल्ह्यासाठी देत असलेल्या लाकडी- निंबोडी योजनेचा पुनर्विचार करू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापुरातील शिवसैनिकांना दिला आहे.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका समन्वयक दीपक पाटणे, ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर, माजी शहरप्रमुख संजय शीलवंत, राजेंद्र मिरगळ, उद्योगपती श्रीकांत पवार यांनी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.यावेळी शिष्टमंडळाशी औपचारिक बोलताना आषाढीला मी पंढरपूरला येत असून या दिवशी फक्त शासकीय कार्यक्रम आहेत. मात्र सोलापुरातील प्रश्नासाठी मंत्रालयात स्वतंत्र बैठक लावू, असे आश्वासन दिले.
सोलापूर जिल्ह्यातील कोणताही शिवसैनिक माझ्याकडे काम घेऊन आला तर त्याला मोकळ्या हाताने परत पाठवणार नाही, असा विश्वास देऊन येणाऱ्या काळात शिवसैनिकाला ताकद देणे त्याला मजबूत करणे व त्या माध्यमातून संघटना मजबूत करणे याकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोना काळात 20 लाख रुपये किमतीची रुग्णवाहिका करमाळा तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी मोफत दिली होती. या रुग्णवाहिक वाहिकेतून 372 रुग्णांना मोफत इच्छित नवीन हॉस्पिटलला हलवण्यात मदत झाली. याचाही आढावा वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक दीपक पाटणे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिली.
