नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी नोकरीसाठी जाॅब फेअरचा लाभ घ्यावा- प्रा.रामदास झोळ
करमाळा प्रतिनिधी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना चांगली संधी आली आहे. करमाळा येथील विकी मंगल कार्यालयात शनिवारी (ता. ९) प्रा. रामदास झोळ फाउंडेशन व भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्था यांच्या वतीने ‘जॉब फेअर २०२२’ होणार आहे. अशी माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा रामदास झोळ यांनी दिली आहे. यामध्ये पात्र उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत, स्पॉट सिलेकशन केले जाणार आहे.करमाळा येथे होणाऱ्या या जॉब फेअरमध्ये २० पेक्षा जास्त नामवंत कंपन्यांनाच सहभाग असणार आहे. २०१९, २०, २१ मधील पासआऊट व २२ मध्ये शिक्षण घेत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी असणार आहे. येथे येणाऱ्याला प्रत्येकाला संधी मिळण्याची शक्यता असणार आहे.शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासून याची सुरुवात होणार असून १२ वी पास, आयटीआय, ऍपरांटी, ट्रेनी, डिप्लोमा इंजिनिअरिंग, एमसीव्हीसी, बीए, बीकॉम, बीएससी, डिग्री इंजिनिअरिंग, एमबीए, एमसीए, एमएस्सी, बीसीए, एमसीएल, डी. फार्म, बी. फार्म, एम. फार्म, बीएससी. ऍग्री झालेल्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य प्रा .रामदास झोळ यांनी केले आहे.
