करमाळा

करमाळा-माढा संयुक्त विधानसभा मतदारसंघातील मौजे रिधोरे, ता. माढा येथे दिनांक ६ ऑक्टोबर रोजी प्रा. रामदास झोळ सर यांचा जनसंवाद व शेतकरी मेळावा

करमाळा प्रतिनिधी करमाळा-माढा संयुक्त विधानसभा मतदारसंघातील मौजे रिधोरे, ता. माढा येथे दिनांक ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायं .०७:०० वा. प्रा. रामदास झोळ सर यांचा “जनसंवाद व शेतकरी मेळावा” आयोजित करण्यात आले आहे. सदर मेळाव्याचे आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने करण्यात येत आहे. तरी करमाळा तालुका व माढा संयुक्त विधानसभा मतदारसंघातील जनतेशी त्यांच्या विविध समस्यांवरती विचारविनिमय करण्यात येणार आहे. तसेच शिक्षण, आरोग्य व रोजगार या समस्यांवर कसा उपाय योजना आखण्यात येईल यासाठी प्रा. रामदास झोळ सर जनतेशी संवाद साधणार आहेत. आपल्या शेतमालाला हमीभाव व उसाला योग्य दर कसा मिळेल याबाबत प्रा. रामदास झोळ सर शेतकऱ्यांची संवाद साधणार आहेत. तरी सर्व जनतेला आव्हान करण्यात येत आहे की सदर जनसंवाद यात्रा व शेतकरी मेळाव्यास आपण बहुसंख्य संख्येने उपस्थित राहून मेळाव्याची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group