175 मॅट्रिक टन डीएपी खताचा साठा करमाळा तालुक्यात उपलब्ध
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 175 मॅट्रिक टन डीएपी खताचा साठा खुला करण्यात आला असून प्रतिगुणी तेराशे पन्नास रुपये प्रमाणे एका शेतकऱ्याला दोन पोते प्रमाणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे व तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे पंचायत समितीचे कृषी अधिकारी शंकर मिरगणे यांनी दिली आहे.
अडचणीच्या काळात खत टंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने डीएपी खताचा करमाळा तालुक्यासाठी 175 मॅट्रिक करण्याचा साठा करण्यात आला होता
महेश ऍग्रो एजन्सी करमाळा येथे साठ मॅट्रिक .,टन ,,सद्गुरु कृषी भांडार कंदर येथे 75 ,,,मॅट्रिक टन,, माऊली कृषी केंद्र करमाळा 20 टन,, बालाजी ऍग्रो एजन्सी करमाळा येथे 20 टन ,,,याप्रमाणे खत उपलब्ध करून देण्यात आले आहे प्रत्येक शेतकऱ्याला दोन पोते डीएपी खत देणार देण्यात येणार असून खत घेताना प्रत्येकाने आधार कार्ड आणणे गरजेचे आहे अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
