Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळाराजकीय

करमाळा नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले 18आॕगस्टला मतदान 19 आॕगस्टला निकाल

करमाळा प्रतिनिधी राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार आहेत. लगेच 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत.
यामध्ये सोलापूर जिल्ह्यात बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, दुधनी, मोहोळ, अनगर, सांगोला, मंगळवेढा, अकलूज, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी या नगरपालिकांची निवडणूक होत आहे.
पाच जुलै रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रामाणित करून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तर 20 तारखेला जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. त्यानुसार 22 जुलै ते 28 जुलै अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. या निवडणुकांसाठी 18 ऑगस्ट रोजी मतदान तर 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group