करमाळासकारात्मक

करमाळा शहरामध्ये मोकाट जनावरांना लॅम्पीचा प्रार्दृभाव ताबडतोब बंदोबस्त करण्याची मनसे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांची मागणी

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरामध्ये मोकाट फिरणाऱ्या गाईंना लॅम्पी आजाराचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसत येत असून मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरत असल्याने याचा प्रार्दृभाव टाळण्यासाठी या जनावरांचा ताबडतोब बंदोबस्त करून त्यांच्या उपचाराची सोय करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्याकडे केली आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की करमाळा तालुक्यामध्ये जनावरामध्ये लॅम्पी आजार जरी आटोक्यात आला असला तरी करमाळा शहरात मात्र मोकाट जनावरांमुळे हा आजार पसरून मोठ्या प्रमाणात पशुहानी होऊ शकते याचा ताबडतोब विचार करून मुख्याधिकारी यांनी या मोकाट जनावरांच्या मालकांना नोटीस काढून संबंधित जनावरे पशु वैद्यकीय दवाखाना करमाळा यांच्याकडे तपासणी करून त्यांची स्वतंत्रपणे उपचाराची सोय करावी अन्यथा गंभीर परिणाम लागणार असून आणि त्यासाठी वाचवण्यासाठी याची दखल घेऊन ताबडतोब पावली उचलावीत अन्यथा मनसेच्यावतीने आंदोलन करण्याचा इशाराही नानासाहेब मोरे यांनी दिला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group