करमाळा तालुक्यातील पुनवर गावच्या लेकीने चढविला तुळजाभवानी येडेश्वरी आईच्या शिखराला कळस
पुनवर प्रतिनिधी.९ ऑक्टोबर ज्ञानदेव रचिला पाया तुका झालास कळस या उक्तीप्रमाणे मौजे पुनवर येथे जय तुळजाभवानी मंदीर व येडेश्वरी मंदीराच्या शिखराला गावातील बाहेरगावी लग्न होऊन गेलेल्या लेकीने (माऊलींनी ) आपल्या वर्गणीतून भव्य अशी कळसाची गावातून मिरवणूक काढून मंदीराला कळस चढविला .करमाळा तालुक्यात पाहिल्यांनदाच भव्यदिव्य असा कार्यक्रम पुनवर येथील जय तुळजाभवानी मित्रमंडळाच्या सहकार्याने व गाम्रस्थांच्या सहकार्याने उत्साहात पार पाडला . या कार्यक्रमाला करमाळा तालुक्यातून व बाहेरील तालुक्यातून गावातील लेकी मोठया संख्येने उपस्थित होत्या . अशा या भव्यदिव्य व स्तुत्य अशा उपक्रमाची तालुक्यात चर्चा सुरू आहे . कार्यक्रमानंतर सर्व लेकींना साडी – चोळी करुन महाप्रसाद म्हणून स्वादिष्ट अशा जेवणाचे आयोजन केले . अशा या सुंदर कार्यक्रमाचे नियोजन जय तुळजाभवानी तरुण मित्र मंडळ व सर्व ग्रामस्थांनी केले .*