करमाळा

करमाळा नगर परिषदेने त्वरित योग्य ते गणेश विसर्जनाचे नियोजन करावे-सौ.राजश्री माने

करमाळा प्रतिनिधी करमाळा नगर परिषदेने त्वरित योग्य ते गणेश विसर्जनाचे नियोजन करावे अशी मागणी नगरसेविका राजश्री दत्तात्रय माने यांनी केली आहे.करमाळा शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळाचे व घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी करमाळा नगरपरिषद जो खड्डा तयार करतात तो न करता प्रांत अधिकाऱ्यांनी नगरपालिकेस करमाळा शहरातील एखादी खाजगी विहीर अधिग्रहण करून देण्यात यावी व विसर्जन झाल्यानंतर थोड्या दिवसांनी त्या विहिरीची स्वच्छता नगरपालिके कडून करून घ्यावी. यामुळे नागरिकांच्या भावनाही दुखावल्या जाणार नाही. शहरातील काही मंडळाचे व घरगुती गणपती पाचव्या व सातव्या दिवशी पडतात. त्यामुळे लवकरात लवकर विहीर अधिग्रहण करून द्यावी. अशी मागणी करमाळा नगर परिषदेच्या नगरसेविका राजश्री दत्तात्रय माने यांनी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!