भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यात संघटन बळकटीसाठी काम करणार – जितेश कटारिया
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा पश्चिम जिल्हाध्यक्षपदी गणेश भाऊ चिवटे यांची विजय झाल्याबद्दल नंदन प्रतिष्ठानच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते..भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर जिल्हा पश्चिम जिल्हाध्यक्षपदी गणेशभाऊ चिवटे यांची झालेली निवड ही पक्षवाढीसाठी अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्या नेतृत्वात करमाळा शहर व तालुक्यात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याची भूमिका भाजपचे सरचिटणीस जितेश कटारिया यांनी व्यक्त केली.यावेळी जितेश कटारिया म्हणाले, “गणेशभाऊ चिवटे यांच्यासा
रखा अभ्यासू, कार्यक्षम आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारा नेता जिल्हाध्यक्ष झाल्याने पक्षाला नवसंजीवनी मिळेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातील बूथस्तरापासून पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल. नवीन कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे, नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती पोहोचवणे आणि पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत नेण्यासाठी सातत्याने काम केले जाईल.”यावेळी त्यांनी गणेशभाऊ चिवटे यांचे अभिनंदन करून त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला आगामी काळात अधिक यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.यावेळी सत्कार सोहळ्यात बोलताना गणेश भाऊ चिवटे यांनी देखील पक्ष संघटना वाढीसाठी लागेल ती मदत देण्याचे आश्वासन दिले. या सत्कार सोहळ्यासाठी भाजपाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि प्रतिष्ठानचे सर्व सहकारी उपस्थित होते


