भोसे गावच्या नुतन सरपंचपदी अमृता प्रितम सुरवसे यांची बिनविरोध निवड
करमाळा प्रतिनिधी
भोसे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अमृता प्रितम सुरवसे यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली आहे. अमृता सुरवसे या यापूर्वी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच होत्या. मधल्या कालावधीमध्ये उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर वारे यांना उपसरपंचपदी निवडल्या होत्या. सध्या सरपंच म्हणून असणारे डॉ. प्रा. दीपक सुरवसे यांनी पार्टी अंतर्गत निर्णयानुसार राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदी अमृता सुरवसे यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अमृतासुरवसे साडे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक यांनी एन. डी. सुरवसे यांच्या स्नुषा आहेत. एन. डी. सुरवसे यांनी देखील या आधी भोसे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद भूषविलेले आहे.
