करमाळाकृषी

आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने करमाळा बाजार समितीमध्ये तीन गट एकत्र निवडणुक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा

करमाळा प्रतिनिधी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने करमाळा बाजार समितीमध्ये तीन गट एकत्र निवडणुक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा. करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली अनेक दिवसांपासून पाहायला मिळत होत्या. अखेर करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने ही निवडणूक बिनविरोध होत आहे.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप व बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांची अकलूज येथे महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक लागल्यापासून ही निवडणूक होणार की, बिनविरोध होणार ? याविषयी उलटसुलट चर्चा होती.. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कशी होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी माजी आमदार जयवंतराव जगताप गट, माजी आमदार नारायण पाटील गट, बागल गट या सर्व गटांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
दोन दिवसांपूर्वीच आमदार संजय शिंदे गटाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे उर्वरित तीन गटांमध्ये काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. गुरुवारी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी अकलूज येथे जाऊन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भेट घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात चर्चा केली होती.शुक्रवारी शिवरत्न बंगल्यावर आमदारांची मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
या बैठकीत बागल गटासाठी दोन व माजी आमदार नारायण पाटील गटासाठी दोन या ग्रामपंचायत मतदारसंघांतील जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. उर्वरित सोसायटी मतदारसंघातील 11 जागा माजी आमदार जयवंतराव जगताप गटाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी धैर्यशील मोहिते पाटील, नवनाथ झोळ, अजित तळेकर , देवानंद बागल, कल्याण सरडे, भारत पाटील उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!