Friday, April 25, 2025
Latest:
आध्यात्मिककरमाळा

पोधंवडी गावच्या बजरंग बलीचा महिमा अपरंपार असून देवस्थान विकासासाठी सहकार्याची गरज-संतोष काका कुलकर्णी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पोंधवडी हे जागृत नवसाला पावणारा पवनपुत्र हनुमानाचे गाव म्हणून प्रचलित होत असून बजरंग बली महिमा महाराष्ट्रभर पसरला असून या देवस्थानच्या विकासासाठी भाविक भक्ता बरोबरच तिर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत शासनाने सहकार्य करावे असे मत उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांनी व्यक्त केले. पोंधवडीचा बंजरगबली भक्तांच्या हाकेला धावून येणारा असुन अनेक भाविक भक्तांना त्याची प्रचिती आली आहे. दर पौर्णिमेला भाविक भक्तांना अन्नदान करण्यात येत असून पाच वर्ष अन्नदान करण्यासाठी नंबरही लागत नाही.एवढा महिमा श्रेष्ठ आहे.अशा या देवस्थानच्या विकासासाठी भाविक भक्तांबरोबर शासनाचे तिर्थक्षेत्र योजनेतून सहकार्य मिळणे गरजेचे आहे.
या बंजरगबलीचा महिमा अपरंपार असून हजारो भाविकांच्या जीवनात बदल झाला असून जसा भाव तसा देव या उक्तीप्रमाणे अनुभव हिच खरी प्रचिती आहे.आजच्या विज्ञान युगात मनुष्याने पैसा पद प्रतिष्ठा प्राप्त केली असली तरी मनःशांती सुखी संप्पन जीवन जगण्यासाठी अध्यात्माशिवाय पर्याय नाही मानवी जीवनात चार पुरुषार्थ सांगितले असुन यामध्ये धर्म अर्थ काम याबरोबरच मोक्ष मार्ग सुकर होण्यासाठी अध्यात्माची जोड आवश्यक आहे.अशा या पवनपुत्र हनुमानाचे दर्शन घेऊन आनंद वाटला असुन या मंदिराच्या प्रचार प्रसार करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी संतोष काका कुलकर्णी यांच्यासह मकाईचे माजी संचालक विवेक येवले, भाजपचे जिल्हा चिटणीस शाम सिंधी, पत्रकार दिनेश मडके नरेंद्रसिंह ठाकुर, संजय चोपडे गुरुजी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group