वाशिंबे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू प्रा. रामदास झोळ पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पँनलचे उमेदवारी अर्ज दाखल
करमाळा प्रतिनिधी.
करमाळा तालुक्यातील वाशिंबे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असुन ही निवडणुक बिनविरोध होण्यासाठी विकासरत्न प्रा.रामदास झोळ सर यांनी दहा लाख रुपयांचे बक्षिस जाहिर केले होते. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी निवडणुक बिनविरोध करण्याचा त्यांचा विचार होता पंरतु राजकारण करण्याचा विचार काही मंडळीचा उद्देश असल्यामुळे ही निवडणुक लागली आहे.जनतेच्या आग्रहावास्तव गावाचा सर्वांगिण विकास हाच उद्देश ठेवुन समविचारी सर्वपक्षीय गटातटाचे राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणारे एकत्र येऊन या पॅनलची उभारणी करण्यात आली आहे.प्रा.रामदास झोळ पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पँनलकडून दिग्विजय बागल यांचे विश्वासू समर्थक श्री.गणेश मनोहर झोळ सौ.मायाताई झोळ,जगदिश पवार यांनी सरपंच पदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल केला आहे.सर्वाच्या संमतीने ज्या उमेदवारांना अधिक पंसदी असेल त्यांना निवडणुक रिंगणात उतरणार आहे. यावेळी दत्तकला शिक्षण संस्था अध्यक्ष रामदास झोळ, सचिव माया झोळ, भिमराव झोळ,प्रा.जाकीर शेख, जगदीश पवार,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) बापूसाहेब गायकवाड,काँगेस अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाअध्यक्ष गफुर शेख, सतिष झोळ,छगन झोळ,रणजित शिंदे,राजेंद्र कांबळे,संतोष झोळ,शंकर कांबळे,ज्ञानेश्वर शिंदे,सुयोग झोळ, रघुनाथ झोळ, प्रसाद धोकटे आदी उपस्थित होते.
