करमाळा

करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी एस. टी. स्टॅण्ड मधील गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणा-या महीलांच्या ताब्यातुन चोरीतील 1,25,000/- रूपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण जप्त

करमाळा प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी एस. टी. स्टॅण्ड मधील गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणा-या महीलांच्या ताब्यातुन चोरीतील 1,25,000/- रूपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण जप्त करण्यात आले आहे. यात हकीकत अशी की दि. 13/07/2025 रोजी दुपारी 03/10 वाचे सुमारास फिर्यादी  कोमल चंद्रकात गोरे वय 28 वर्षे रा अंतरगाव ता भुम जि धाराशिव सध्या रा करमाळा ता करमाळा जि सोलापुर ह्या आपल्या गावाकडे जाणे करता करमाळा बस स्टॅन्ड वर आपल्या मुलासह आल्यानंतर त्या पंराडा जाणा-या बसमध्ये बसण्याकरीता रांगेत उभ्या असताना गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादिच्या गळ्यातील एक तोळा चार ग्राम वजणाचे सोन्याचे मिंनी गठण अनोळखी आरोपीने फिर्यादीच्या संमती वाचुन चोरून त्या पळुन गेल्या आहेत. अशा आशयाची हकिकत सांगत असल्याने करमाळा पोलीस ठाणे गु.र.नं 560/2025 भारतीय न्यांय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला.

सदर फिर्यादिचे अनुषंगाने मा. पोलीस निरीक्षक रणजित माने यांना सदर गुन्ह्यातील आरोपी महिला असल्याची माहीती मिळाल्याने त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना व महिला अंमलदार यांना योग्य त्या सुचना देऊन गुन्हे तपासाच्या अनुषांगाने C.C.T.V. पाहण्यासाठी व तपास करण्यासाठी 02 पथके तयार करून हद्दीत रवाना केले. C.C.T.V. व्हिडीओ फुटेज व गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने सदर महिलासाठी पथकानी तात्काळ योग्य असा सापळा लावुन 02 महीलास आरोपीस पकडले. त्यानंतर त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याची नावे

1) वर्षा इंतेज चव्हाण वय 20 वर्षे रा. तांदळे वडगाव ता. जि. आहिल्यानगर

2) राधिका शुभम पवार वय 23 वर्षे रा वजिरखेडा पो. पिंपळगाव कोलते ता. भोकरदन जि, जालना असे सांगितले त्यावेळी त्यांना महिला पोलीस अंमलदार यांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणले असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिला पंरतु त्यांना सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषगाने महिला पोलीस अंमलदार यांनी आधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांनी निवेदन पंचनामा करणेस निवेदन दिल्याने गुन्ह्यातील 1,25,000/- रूपये किंमतीचे एक तोळा चार ग्राम वजणाचे सोन्याचे मिंनी गठण जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ/ 1828 शेळके हे करत आहेत.सदरची कामगिरी ही श्री अतुल कुलकर्णी सो, पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक डॉ. प्रितम यावलकर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, पोसई संदिप बनकर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेका अजित उबाळे, पोना मनिष पवार, पोना वैभव ठेंगल, पोर्को अर्जुन गोसावी, पोकों/स्वप्नील शेरखाने,  रविराज गटकुळ, पोकॉ/अमोल रंदिल, पोकॉ/योगेश येवले,  मिलीद दहिहांडे, पोकॉ/गणेश खोटे, तसेच सायबर पोलीस ठाणेचे पोहेकॉ  व्यकंटेश मोरे यांनी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!