यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात ग्रंथालय दिन साजरा’
करमाळा प्रतिनिधी
करमाळा दि . १२/०८/२०१२ येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड उपस्थित होते .तसेच उपप्राचार्य कैप्टन संभाजी किर्दाक , डॉ. व्ही. वाय. खरटमल आणि अंतर्गत गुणवत्ता निर्धारण समितीचे समन्वयक प्रा. अभिमन्यू माने हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये ग्रंथपाल डॉ. सपना रामटेके यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे जीवन व कार्य यांचा परिचय करून दिला व ग्रंथालया द्वारे राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी केंद्रित उपक्रमांची माहिती दिली.अध्यक्षीय मनोगता मध्ये प्राचार्य डॉ . एल. बी. पाटील यांनी मराठी व इंग्रजी साहित्यातील अनेक दाखले देऊन ग्रंथ आणि ग्रंथालय यांचे जीवनातील महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे आभार श्री ज्ञानेश्वर कबाडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री आर . बी . पवार , श्रीमती राजश्री शिंदे आणि श्रीमती मेघा कदम यांनी विशेष परिश्रम घेतले .
