Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळा

डिकसळ पुलावरील धोकादायक टोकदार गर्डरमुळे अपघाताची शक्यता उपाययोजना करण्याची.युवा सेना जिल्हा समन्वयक निखील‌ चांदगुडे यांची मागणी


करमाळा प्रतिनिधी
बाळासाहेबांची शिवसेना’ युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे हे कामानिमित्त मुंबईला जात असताना डिकसळ पुलावरील अर्धवट कापलेला धोकादायक गर्डर त्यांच्या निदर्शनास आला. यावेळी समयसूचकता दाखवत त्यांनी आपली गाडी बाजूला घेतली. गाडीतून उतरून या धोकादायक गर्डर वर मोठे दगड ठेवून इतर वाहनचालकांना संभाव्य अपघातापासून वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. एखाद्या वाहनाचे चाक गेले तर टायर फुटून मोठा अपघात होऊ शकतो, हे लक्षात घेऊन त्यांनी आणि ॲड. प्रियाल आगरवाल यांनी या गर्डरवर मोठे दगड ठेवले आहेत.या ठिकाणी बाजुलाच महावितरणच्या मेन लाईनचे पोल असून डि.पी. सुद्धा असल्याने अपघात झाला तर आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.याबाबत सक्षम अधिका-यांना सदर धोकादायक गर्डरबाबत माहिती देऊन तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group