करमाळयाचे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांचा जेऊर ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार संपन्न…
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील बहुप्रतिक्षित असलेल्या व तालुक्यातील लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या जातेगाव टेंभुर्णी महामार्गाचा प्रश्न आमदार शिंदे यांनी मार्गी लावल्याबद्दल जेऊर ग्रामस्थांच्या वतीने आमदार शिंदे यांचा नागरी सत्कार दिनांक 7 जानेवारी रोजी जेऊर येथे संपन्न झाला.आमदार शिंदे यांच्या प्रयत्नामुळे अलीकडेच टेंभुर्णी ते जातेगाव हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडे हस्तांतरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून NOC (ना हरकत) देण्यात आली आहे. या कार्याबद्दल जेऊर ग्रामस्थांच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला .
जेऊर येथील ग्रामस्थ देवानंद पाटील बाळासाहेब करचे ,हनुमंत कोठावळे ,दशरथ कुंभार ,रामभाऊ घोरपडे, अभयराज लुंकड, नितीन खटके पाटील ,दत्तात्रय जाधव, विष्णूभाऊ माने ,यांनी हा सत्कार केला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या तालुका उपाध्यक्ष पदी राकेश देवानंद पाटील यांची निवड झाल्याचे पत्र आ.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी पंचायत समिती माजी सदस्य विलास दादा पाटील ,तानाजी बापु झोळ, उद्धव दादा माळी ,माजी सभापती चंद्रहास निमगिरे, वामन दादा बदे , बालाजी गावडे, उमेश पाथ्रूडकर, अमर गादीया, निकील मोरे, निलेश पाटील, बाबू शिंदे, राहुल घोरपडे, सुनिल सांगवे, दीपक सुरवसे, अतुल निर्मळ, अरुण निर्मळ, आजिनाथ माने, शिवम कोठावळे, अभिजित म्हमाणे ,धनंजय लोंढे, सचिन शेळके, करचे सर ,समीर केसकर , सचिन कसबे, रामानंद गुंडगिरे , आदी उपस्थित होते .
