Wednesday, April 16, 2025
Latest:
करमाळा

मांजरगाव ग्रामपंचायतीकडून प्रत्येक कुटुंबाला अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप.


करमाळा प्रतिनिधी नरेंद्रसिंह ठाकुर                 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांजरगाव ग्रामपंचायतीने गावातील सर्व ग्रामस्थांना या आधी सॕनिटायझरचे डेटॉल साबण सुरवातीच्या काळात वाटप केले आहे. त्यानंतर कोरोना चा प्रकोप आणखीणच वाढत चालला म्हणुन आपल्या गावातील सर्व नागरीक या रोगापासुन सुरक्षित रहावे यासाठी गावात दोन वेळा औषधाची फवारणी केली तसेच नंतर थर्मल स्क्रिनिंग आणि पल्समीटरसह घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली, परंतु आता मात्र कोरोनाने आपल्या तालुक्यामध्ये प्रवेश केल्यामुळे वाढलेल्या सुरक्षेच्या जाणिवेतुन ग्रामपंचायतने प्रत्येक कुटुंबाला थेट घरपोच आयुष मंत्रालय भारत सरकारने सुचविलेल्या अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या प्रत्येक कुटुंबाला साधारण १०० गोळ्या घरपोहच देण्यास सुरुवात केली आहे दोनच दिवसात या गोळ्या घरोघरी पोहच करण्यात येतील तसेच जनतेस या गोळ्यासाठी मार्गदर्शक सुचना देणारे माहीती पत्रक ही दिले जाणार आहे ग्रामपंचायत कडून ग्रामस्थांची पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे.                                 ग्रामस्थांच्या आरोग्याबाबत ग्रामपंचायत प्रत्येकवेळी दाखवत असलेली तत्परता आणि संवेदनशीलतेचं गावकऱ्यांनागावकऱ्यांना अप्रुप वाटत आहेच. तसेच प्रत्येक उपक्रमाला तेवढाच सक्रिय पाठिंबा देत गावकरीही एकमेकांची काळजी घेत आहेत.
सुदैवाने आतापर्यत परिस्थिती नियंत्रणात आहे. पण त्या आधीच सर्व पातळ्यांवर ग्रामपंचायत प्रशासन योग्य ती काळजी घेत आहे.
ग्रामपंचायत आपली सर्वांची काळजी घेत आहे परंतु सर्व ग्रामस्थांनी देखिल शासनाने वेळोवेळी घालुन दिलेल्या नियमांचे पालन सर्व ग्रामस्थांनी करावे व आपले घर व आपले गाव सुरक्षित ठेवण्यास ग्रामपंचायतीस यापुढेही मदत करावी असे आवाहन लोक नियुक्त सरपंच सौ.गायत्री महेश कुलकर्णी यांनी केले आहे. प्रातिनीधिक स्वरूपात आज सकाळी वाटपास ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरुवात करण्यात आली असून यावेळी ग्रा पं उपसरपंच आबासो चव्हाण , पोलिस पाटील राजेंद्र पाटील , श्री कांबळे भाऊसाहेब ग्रा.पं. सदस्य हनुमंत खरात , मा.सरपंच महेश कुलकर्णी, नामदेवभाऊ चव्हाण, आप्पा खरात, सोपान चव्हाण, हनुमंत धारेकर, आण्णा खरात, अनिल चौधरी, आदी ग्रामस्थ तसेच मामु खरात ग्रा पं शिपाई व संगणक चालक उमेश धारेकर आदी उपस्थीत होते .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group