करमाळा शहर व ग्रामीण भागात 21 जुलै रोजी एकुण 18 पाॅझिटीव्ह एकुण कोरोना रूग्णाची संख्या-50
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहर व ग्रामीण भागातील 21 जुलै रोजी एकूण 92 antigen टेस्ट घेण्यात आल्या असून त्यापैकी एकूण 18 कोरोना रुग्ण पाॅझिटीव्ह आढळून आले आहेत व 74 निगेटिव्ह आले आहेत.18 पैकी करमाळा शहरातील 2 स्त्रिया व 2 पुरुष असे शहरातील एकुण चार पाॅझीटीव्ह आले असुन ग्रामीण भागातील वरकुटे- 1 सालसे -2 आळसुंदे-11असे एकुण -14 कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत आता करमाळा शहर व तालुक्यातील एकुण रुग्णाची संख़्या 50 झाली आहे.
अलिकडील काळात रूग्णांची संख्या वाढत असली तरी लोकांनी स्वंयशिस्त पाळावी. रॅपिड अँटिजेन test ची संख्या तालुक्यात वाढविण्यात येणार आहे.
प्रशासनाच्या सुचनांची अंमलबजावणी करावी.मास्क सॅनिटायझरचा वापर करा.आपले हात वारंवार स्वच्छ धुवा असे आवाहन करमाळा तहसीलदार समीर माने यांनी केले आहे .

