कोर्टी येथील ग्रामपंचायत सदस्य रोहिदास शिंदे यांचा शिंदे गटाला राम राम करत बागल गटात जाहीर प्रवेश….बागल गटाच्या मेळाव्यास उत्सूर्फ प्रतिसाद.
.
करमाळा.प्रतिनिधी
कोर्टी ग्रामपंचायत सदस्य रोहिदास शिंदे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांचा संजय मामा शिंदे गटाला राम राम करत रश्मी दिदि बागल,मकाईचे मा.चेअरमन दिग्विजय बागल, मार्गदर्शक विलासराव घुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोर्टी येथील बागल गटाच्या जाहीर सभेत प्रवेश झाला.भाजप महीला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल,मकाईचे मा. चेअरमन दिग्विजय बागल, यांच्या नेतृत्वाखाली कोर्टी येथील कार्यकर्त्यांकडू जाहीर सभेते आयोजन करण्यात आले होते.बागल गटाच्या मेळाव्यांला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे.युवा नेते दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बागल गट प्रणीत भारतीय जनता पक्षात सर्व मतभेत विसरुन गावोगावी होणाऱ्या प्रत्येक मेळाव्यात प्रवेश करणारांची संख्या वाढत चालली आहे.करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी दुरावलेल्या सर्वांना विधानसभा निवडणुकीपर्यंत सोबत घेणार असल्याचा निर्धार करत दिगंबरराव बागल हे नाव विधानसभेत पाठवण्याचे आवाहन भाजपचे युवा नेते दिग्विजय बागल करतआहेत.
यापूर्वी वीट येथील मेळाव्यात पोंधवडी गावचे युवा नेते अमोल गाडे यांनी तर सालसे येथील तानाजी लोकरे यांनी केतूर येथील मेळाव्यात जाहीर प्रवेश केला आहे.तसेच सोगाव ग्रा.पंचायत मा.सरपंच कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.संचालक कैलास पाखरे यांनी वाशिंबे येथील मेळाव्यात जाहीर प्रवेश केला आहे.तर शेटफळ येथील मेळाव्यात रामवाडीचे मा.सरपंच संतोष वारगड,जिंतीचे अंकुश महाराज खराडे, सिकंदर शेख, तसेच निमगाव ह.येथील मेळाव्यात हिवरेचे मा. सरपंच बापू फरतडे, यांनी जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी मार्गदर्शक विलासराव घुमरे,भाजप महीला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल, युवा नेते दिग्विजय बागल,फंड सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला श्री.मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर,मा.उपसभापती चिंतामणी जगताप,आदिनाथचे मा. व्हाईस चेअरमन.नानासाहेब लोकरे,रंगनाथ शिंदे, कुलदीप पाटील,नवनाथ बागल,सतिश नीळ,अजित झांजूर्ने,रेवन्नाथ निकत,अशिष गायकवाड,राजेंद्र मोहोळकर गणेश तळेकर ,महेश तळेकर,विलास काटे,डॉ.विजय रोकडे,युवराज रोकडे,अँड.सोनवणे,अँड.जयदीप देवकर,सचिन पिसाळ, स्वप्निल गोडगे, आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
