कोरोनामुळे करमाळा येथील नागपंचमी यात्रा रद्द घरीच राहुन नागोबाची पुजा करण्याचे ट्रस्टी पुजारी रामचंद्र दळवी यांचे आवाहन.

करमाळा प्रतिनिधी
कोरोनामुळे यावर्षी नागपंचमीची यात्रा होणार नाही भाविकांनी घरीच राहून नागोबाचे पुजन करावे असे आवाहन नागोबा मंदिराचे ट्रस्टी तथा पुजारी रामचंद्र दळवी यांनी केले आहे.यावेळी ट्रस्टी महेश दळवी, अक्षय दळवी, जयंत दळवी उपस्थित होते.
पुजारी रामचंद्र दळवी म्हणाले,सालाबादप्रमाणे नागपंचमीची यात्रा रावगाव रोडवरील मंदिर परिसरात आपण मोठ्या उत्साहात साजरी करत आलो आहे.परंतु यावेळेस करोना महामारीने संपूर्ण देशात हाहाकार केला आहे सध्या आपल्या करमाळा तालुक्यात व शहरात सुध्दा खुप रूग्ण दिसून आले आहे. याची खबरदारी म्हणून यावेळेस उत्सवमूर्तीची पुजा नागपंचमी दिवशी आहे त्या ठिकाणी केली जाणार आहे त्यामुळे शहरातील व तालुक्यातील जे नागरिक दर्शन व पुजेसाठी येतात त्यांनी येऊ नये नागपंचमी घरीच पुजा आर्चा करून साजरी करावी असे रामचंद्र दळवी यांनी भाविकांना आवाहन केले आहे.
