स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुध दरवाढीसाठी ग्रामदेवतेला अभिषेक करून दुध बंद आंदोलन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील रावगाव शेळकेवस्ती येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके व ग्रामस्थांनी ग्रामदैवत मारूतीला दुधाचा अभिषेक करुन दुध बंद आंदोलनाला सुरुवात केली तसेच कंदर सातोलीचे बापू फरतडे पुर्वसोगाव मा. स्वा.पक्ष जिल्हा अध्यक्ष रविंद्र गोडगे वाशिंबे ता.अध्यक्ष भाऊ झोळ आण्णां झोळ जातेगाव अमोल घुमरे तुषार शिंदे दिपक शिंदे.दःवडगाव,मांगी,देवळाली,मोरवड,रावगाव, अशा अनेक गावांमध्ये ग्रामस्त शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ग्रामदैवताला दुधाचा अभिषेक घालून सरकारचा जाहीर निषेध केला. शेतकऱ्यांची मागणी.दुधाला 25रू दर व 5रू अनुदान मिळुन. 30रू दर जाहीर करावा अशी आहे. कोरोना महामारीने आधिच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्याना वाचवण्यासाठी दुधाचा दर किमान 30रू मिळाला तर शेतकरी वाचेल. सरकारने याकडे लक्ष द्यावे व दुध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल.तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडुन केलेल्या आंदोलनाला करमाळा तालुक्यातील सर्व दुध उत्पादक शेतकरी व दुध संघ चेअरमन/कार्यकारी संचालक यांनी दुध संकलन बंद ठेवून सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे स्वाभिमानी शेतकरी संघटना आभार मानले आहेत.
