दूध दरवाढीसाठी निंभोरे येथील शेतकरी आक्रमक दुध ओतुन देऊन आंदोलन

जेऊर प्रतिनिधी
महाराष्ट्रात दूध उत्पादक हा प्रामुख्याने शेतकरी भूमिहीन शेतमजूर आहे लाॅकडाऊन मुळे हाताला काम नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. पाण्यापेक्षा दुधाचे दर कमी आहेत उत्पादन खर्च देखील दूध उत्पादकांच्या हाती लागत नाही पशुखाद्याचे दर गगनाला गेले आहेत त्यामध्ये महागाई भडकली आहे निसर्ग साथ देत नाही रोगराईचे सावट जगावरती आहे ही सर्व विघ्ने असताना दुधाचे दर कमी असल्यामुळे त्यांचा उत्पादन खर्चही तेवढा भाव असताना निघत नाही. त्यामुळे शासनाने दुधाचे दर योग्य करून द्यावेत अशी मागणी निभोंरे येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांची आहे. यावेळी दुधाचे दर वाढवावे अशा घोषणा करीत आज निंभोरे येथे दूध ओतून देण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सचे पालन करून शांततेने कायदा सुव्यवस्थेला बाधा न लावता सर्व शेतकऱ्यांनी शांततेत शिस्तबद्ध आंदोलन केले यावेळी निंभोरे येथील सर्व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
