तिरुपती बालाजीचे १००८ वेळा पायी दर्शन करण्याचा बालाजी भक्त लक्ष्मण बुधवंत यांचा संकल्प चौथ्या वर्षात पन्नास वेळा पायी दर्शन

करमाळा प्रतिनिधी मानवी जीवनात भक्तीलाअत्यंत महत्व असुन बालाजीच्या भक्तीने आपल्या जीवनात आनंद व स्थिरता आली असुन जीवन सुखी संप्पन झाले असून एक हजार आठ वेळा दर्शन करण्याचा आपला संकल्प असल्याचे बालाजी भक्त लक्ष्मण बुधवंत यांनी सांगितले आहे. बालाजी भक्तीचा भाव मनात ठेवून आपणास १६ जुन २०१७पासुन बालाजी दर्शनासाठी येत असुन व दर महिन्याच्या पौर्णिमेला येत राहिलो आणि महिन्यातुन एकदा दोनदा असे करत आज चौथ्या वर्षात पन्नासवेळा पायी दर्शन केले आहे. १६/६/२०२०ला आपणास चौथे वर्ष लागले आहे.. यामध्ये आमचे बंधु हैदराबादचे वेणुकुमारजी चुक्ला ,हरिनाथ गौंड, अविनाश आबा अडसूळ, सुधीर आबा भाडळे, सुरेश बापु सातव,केशव दराडे, निलेश बुधवंत, गणेश बुधवंत,राहुल बुधवंत,संतोष मांटे,राहुल वनारसे,रजत भैय्या यादव, विजयजी गांधी,जागते भाऊसो,प्रताप बरडे, विष्णुपंत गर्जे, इत्यादी लोकांची मोलाची साथ मिळत गेली… या अंतर्गत आम्ही सर्वांनी मिळून कालिंदा फाऊंडेशन पुणे,वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली, यामध्ये आम्ही आपल्याच तालुक्यातील भरपुर लोकांना बालाजी यात्रेचे आयोजन करून देवदर्शन यात्रा काढत असतो रावगांव आणि रावगाव शेजारील शाळांमध्ये दरवर्षी शालेय साहित्य वाटप , दिवाळी मध्ये गोरगरिबांना आर्थिक मदत व किराणा साहित्य वाटप हे काम सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून करत आहे.
