करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ध्वजारोहन सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर सर यांच्या शुभहस्ते तर उपसभापती श्री चिंतामणी(दादा)जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
करमाळा प्रतिनिधी भारत देशाच्या 75 वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ध्वजारोहन सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर सर यांच्या शुभहस्ते तर उपसभापती श्री चिंतामणी(दादा)जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न् झाले.राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर स्व.देशभक्त नामदेवरावजी जगताप व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंदकुमार ढेरे,अमोल झाकणे,संतोष वारे तसेच सचिव विठ्ठल क्षिरसागर, रविंद्र उकीरडे,महेश ढाणे,रतन काळे,वसंत बरडे,श्रीकांत शिंदे,सुरेश भांडवलकर ,अमोल नलवडे आदी कर्मचारी व्यापारी,हमाल,व्यवसाईकदार उपस्थित होते.
