Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळाकृषीताज्या घडामोडीपंढरपूरराजकीयसाहित्यसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याची शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे यांची मागणी.

 करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यात सध्या बिबट्याचा वावर असुन शेतकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्यामुळे रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे व शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड यांनी उपॶभियंता वीज महावितरण कंपनी करमाळा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात असे म्हटले आहे की करमाळा तालुक्यातील रावगाव येथील फुंदेवाडीतील कल्याण फुंदे या तरूण शेतकऱ्यांचा काल रात्री ज्वारीला पाणी देत असताना निष्पाप बळी गेला असल्याने करमाळा तालुक्यातील शेतकरी बांधवांमध्ये सध्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्याच्या काळात ज्वारी भरण्याचे दिवस असल्यामुळे रात्री लाईट असल्यामळे शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून पाणी द्यावे लागत आहे.सध्याच्या परिस्थितीत दिवसा लाईट नसल्याने रात्रीच दारे धरावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवताला धोका निर्माण झाला असून या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार करून करमाळा तालुक्यात योग्य ते नियोजन करून दिवसा लाईट देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे व शिवसेना करमाळा तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड यांनी दिला आहे.
error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group