भिलारवाडी माध्यमिक विद्यालयांमध्ये संविधान दिन साजरा
करमाळा प्रतिनिधी
प्रा.प्रविण अंबोधरे
विद्या विकास मंडळ जवळे संचलित भिलारवाडी माध्यमिक विद्यालय भिलारवाडी येथे आज संविधान दिन उत्सहात साजरा करण्यात आला.
यावेळी कोरोणाच्या पार्श्र्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करुन इयत्ता नववी व दहावीचे वर्ग विद्यालयात भरवण्यात आले आहेत, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी योग्यरित्या घेत आहेत.
विद्यार्थ्यांकडुन संविधानाचे वाचन करुन विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.वाघमारे सर तसेच श्री.येडे सर, सौ.माने मॅडम,व श्री.राजु उगलमोगले व विद्यार्थी उपस्थित होते.
