Friday, April 25, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

आईने केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून पंचाहत्तरीच्या निमित्ताने पाद्यपूजा,ग्रंथतुला व अन्नदान व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

शेटफळ प्रतिनिधी
आईने केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून करमाळा तालुक्यातील वांगी क्रमांक तीन येथे आईच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने मुलांनी केली पद्यपुजा ग्रंथतुला व अन्नदान व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ..
येथिल विकास वाघमोडे यांच्या मातोश्री पमाबाई वाघमोडे यांनी हालाखीची परिस्थिती असताना संघर्षमय जीवनातून आपल्या मुलांना वाढवले व उत्तम संस्कार दिले याची जाणीव ठेवून पंचाहत्तरीनिमीत्त मोठ्या उत्साहात हारिपाठ, ग्रंथतुला, पाद्यपूजा व ऐंद्रीशांती अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यानंतर अक्रूर महाराज गेवराई यांचे किर्तन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मृदंगाचार्य आसाराम साबळे, दादासाहेब डोंबाळे, अदित्य पोळ गायानाचार्य इंडीयन‌ आयडॉल फेम अविनाश जाधव,दत्ता चव्हाण योगीता डोंबाळे यांनी साथ दिली
सुरवातीला विकास वाघमोडे, अशोक वाघमोडे,दिपक वाघमोडे,सिंधू खंडागळे यांनी पाद्यपूजा केली नंतर मातोश्रींची ग्रंथतुला करून ग्रंथतुला केलेले ग्रंथ हसन महाराज अत्तार यांच्या रामकृष्ण हरी वारकरी संस्था (कुर्डू)या संस्थेला दान करण्यात आले.यावेळी बालाजी बोराडे, विनोद रोकडे, माऊली नंदनकर,हानुमंत कोरे, दत्ता डूके, मारूती निंबाळकर, उद्धव भोसले, कल्याण चुंब,माजी आमदार नारायण पाटील, गणेश करे पाटील, हरिदास डांगे, जयप्रकाश बिले, महेंद्र पाटील यांच्यासह परिसरातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group