करमाळा येथे प्रथमच महिलांच्या वतीने ध्वजारोहण संपन्न – प्रियांका गायकवाड, शिवसेना महिला तालुका प्रमुख करमाळा
करमाळा प्रतिनीधी :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत करमाळा येथे किल्ला विभाग लोकमान्य टिळक पुतळा येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम शिवसेना महिला तालुका प्रमुख तथा शिवकन्या सुरक्षा समितीच्या संस्थापिका प्रियांका गायकवाड यांच्या हस्ते मोठया उत्साहात पार पडला.
करमाळा येथे प्रथमच महिला एकत्रीत येत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. यावेळी लोकमान्य टिळक पुतळा येथे आकर्षक तिरंगी फुग्यांची सजावट करण्यात आली होती. पुतळा परिसरात देशभक्तीपर गीते लावून वातावरण चैतन्य निर्माण झाले होते. ध्वजारोहणासाठी उपस्थित महिलांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी दिलेल्या योगदानाची माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थित महिलांनी शिस्तबद्ध पद्धतीने राष्ट्रगीत गाऊन तिरंगा ध्वजाला ध्वजवंदना दिली.
यावेळी मंजिरी जोशी, सोनाली देवी, अश्विनी खळदकर, भारती लष्कर, कविता कांबळे, प्रिती पाटील, प्रज्ञा जोशी, मरियमबी पठाण, अहिल्या सातपुते, सारिका सातपुते, शितल वडे, धनश्री सातपुते, सिमरन पठाण, अपूर्वा कापसे, पल्लवी ननवरे, शांता कदम, जयश्री कांबळे आदि महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
