करमाळा तहसील कार्यालय येथे तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण संप्पन
करमाळा प्रतिनिधी तहसील करमाळा कार्यालय येथे तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण संप्पन करमाळा प्रतिनिधी करमाळा तहसील कार्यालय येथे तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते सोमवारी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व करमाळा शहरातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थितांनी एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनानंतर पहिल्यांदाच मोठ्याप्रमाणात हा उत्सव झाल्याने सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण होते.देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षी सर्वत्र विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. प्रशासनाच्या वतीनेही विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. ध्वजवंदन झाल्यानंतर ‘तंबाखू मुक्तीची शपथ’ घेण्यात आली. त्यानंतर उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार व उपस्थित सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, निवासी (महसूल) तहसीलदार सुभाष बदे, सहायक निबंधक दिलीप तिजोरे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड डॉ. बाबुराव हिरडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, विवेक येवले, चंद्रशेखर शिलवंत, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, तालुका सरचिटणीस अमरजित साळूंखे, राष्ट्रवादीचे अशपाक जमादार, अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार, नगरसेवक अतुल फंड, प्रविण जाधव,नानासाहेब मोरे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. डॉ. लक्ष्मण राख, जेलर समीर पटेल, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण साने आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. तहसील कार्यालयाच्या वतीने करमाळा तालुकाचा ऐतिहासिक वारसा सांगणारे फलक, स्वातंत्र्य सैनिकांची माहिती सांगणारे फलक यावेळी लक्ष वेधत होते. स्वातंत्र्य दिनानिमीत्त करमाळा तहसील, पोलिस ठाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग येथे विद्यूत रोषणाई करण्यात आली असुन याबरोबर फुग्याने कार्यालय सजवण्यात आले होते.करमाळा पोलिसांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मानवंदना दिली. यावेळी महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालात राष्ट्रगीत सादर केले. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संचलन केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन महसुलाचे अधिकारी संतोष गोसावी यांनी केले.