करमाळा शहर व तालुक्यात मंगळवार दिनांक 4 ॲागस्ट रोजी 16 कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण एकुण रुग्णांची संख्या 181

करमाळा प्रतिनिधी मंगळवार दिनांक 4 ॲागस्ट रोजी करमाळा शहरात 120 एॅंटाजीन टेस्ट घेण्यात आल्या असून यामध्ये 16 कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून आले असुन 104 निगेटिव्ह आले आहेत व ग्रामीण भागात 9 टेस्ट घेण्यात आलेल्या असुन सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत अशी माहिती तहसीलदार समीर माने यांनी. दिली आहे. करमाळा शहरातील सिद्धार्थनगर – 2 यामध्ये 1 पुरुष व 1 महिला, श्रीदेवीचामाळ -2 1महिला. व एक पुरुष, भिमनगर -3, 1 महिला व 2 पुरुष, कानाडगल्ली – 2, 1 महिला व 1 पुरुष, घोलपनगर-1 पुरुष, किल्ला विभाग-3, 1महिला व दोन पुरुष, मोईद्दीन तालीम- 1महिला, विद्यानगर-1 महिला, आण्णाभाऊ साठेनगर-1 यांचा समावेश आहे. 4 आॅगस्टरोजी एकुण कोरोना रुग्ण 16असुन आतापर्यंत एकुण रुग्णांची संख्या 181 झाली असून आतापर्यंत 79 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तीन जणांचा मृत्यू झाला आहे 92 जणावर उपचार चालू आहे व आज 4 जुलै रोजी 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करमाळा शहरात कोरोना रुग्ण दररोज वाढत असून नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन तहसीलदार समीर माने, मुख्याधिकारी विणाताई पवार ,पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी केले आहे.

