करमाळा तालुक्यातील युवकांना क्रीडा स्पर्धेसाठी सर्वोत्तपरी सहकार्य करणार -श्री रामदास झोळ सर
राजुरी प्रतिनिधी
राजुरी तालुका करमाळा येथे आजपासून दीपावलीच्या निमित्ताने प्रा. रामदास झोळ सर फाउंडेशनच्या माध्यमातून व राजमुद्रा ग्रुप ,बाळनाथ ग्रुपच्या अयोजनातून भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचा उदघाटन समारंभ दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री रामदास झोळ सर यांच्या शुभहस्ते संस्थेच्या सचिव माया झोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी बोलताना झोळ सरांनी उपस्थित क्रीडाप्रेमींना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या तसेच येत्या काळात याही पेक्षा मोठ्या दिमाखात तालुकास्तरावर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.परिसरातील क्रीडा स्पर्धकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दिल्याचं चित्र पाहायला मिळत होत. सहा दिवस चालणाऱ्या या भव्य क्रिकेट स्पर्धेत तालुक्यातील क्रिकेट संघांनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रा. रामदास झोळ सर फाउंडेशन यांच्या वतीने या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे २२,२२२ रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले असून द्वितीय बक्षीस १५,५५५तृतीय बक्षीस ११,१११ तर चतुर्थ बक्षीस ७,७७७ रुपये ठेवण्यात आलेले आहे.
यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री रामदास झोळ सर,सचिव माया झोळ , गोविंद पर्व कारखान्याचे चेअरमन चंद्रशेखर जगताप,युवा नेते आर आर बापू साखरे, सरपंच डॉ अमोल दुरंदे,श्रीकांत साखरे,उदय साखरे,नंदकुमार जगताप,एकनाथ शिंदे, राजेंद्र भोसले, नवनाथ दुरंदे ,नितीन साखरे,निलेश दुरंदे ,सागर कुलकर्णी,रवींद्र गरुड,सोमनाथ शिंदे,संकेत अवघडे,मुबारक शेख,यांच्यासह गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एम एस साखरे सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रीकांत साखरे यांनी मानले.
