करमाळासकारात्मक

करमाळ्यासाठी लंपी रोगाच्या लसीचा पुरवठा करा-श्रीकांत साखरे

करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र रराज्यातील जळगाव, नगर, अकोला पुणे व धुळे या जिल्ह्यांमध्ये पाळीव जनावरांमध्ये लंपी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याचे निष्पन्न झाले असून नगर जिल्हा या रोगाचे मुख्य केंद्र बनला आहे .नगर जिल्हा करमाळा तालुक्याला लागून असून यामुळे लंपी रोगाचा प्रादुर्भाव करमाळा तालुक्यात होण्याची शक्यता आहे. याचीच खबरदारी म्हणून प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सदर रोग नियंत्रणाबाबत काळजी घेऊन कार्यवाही करावी व करमाळा तालुक्यासाठी लसीचा लवकरात लवकर पुरवठा करावा अशी मागणी राजुरी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत साखरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्र्याचे ओ एस डी श्री मंगेशजी चिवटे यांच्या माध्यमातून केली आहे. यासंदर्भात मंगेश चिवटे यांनी जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर यांना संपर्क करून करमाळा तालुक्यातील लंपी रोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक लसीचा लवकरात लवकर पुरवठा करण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती श्रीकांत साखरे यांनी दिली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!