अक्कलकोट येथे 29 ऑक्टोंबर 2023 रविवारी विनाशुल्क मराठा वधू- वर परिचय मेळाव्याचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी:- महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुपच्यावतीने विनाशुल्क मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन अक्कलकोट शहरात येत्या रविवारी 29 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या कालावधीत करण्यात आले असून यासंदर्भात नुकतीच बैठक घेऊन नियोजन करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुप संकल्पक प्रा.नागनाथ बागल तर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र सोयरिक ग्रुपचे उपाध्यक्ष मनोज गोरे, अक्कलकोट येथील मेळाव्याचे मुख्य प्रवर्तक श्री राजेंद्र महाराज सुरवसे राम (भाऊ) जाधव, जाधव,अमर शिंदे, बापूजी निंबाळकर, स्वामीराव सुरवसे, सौ वर्षा चव्हाण सौ ज्योती पडवळकर सौ रत्नमाला मचाले श्री भीमराव शेळके पंकज पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठा समाजातील मुला-मुलींना मनपसंत स्थळ मिळावे, या उद्देशाने मागील काही वर्षापासून महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुपच्या माध्यमातून प्रा. नागनाथ बागल (कुर्डुवाडी) व त्यांची टीम कार्य करत आहे. यापूर्वीही झालेल्या भोजन व्यवस्थेसह यशस्वीपणे पार पडलेल्या विनाशुल्क वधु वर परिचय मेळाव्याला वधु-वरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता 29 ऑक्टोबर 2023 रोजी अक्कलकोट मेळाव्याचे मुख्य प्रवर्तक श्री राजेंद्र महाराज सुरवसे यांच्या श्री समर्थ सेवा आश्रम ट्रस्ट सोलापूर रोड, अक्कलकोट , जिल्हा सोलापूर येथे 11 ते 4 वाजेपर्यंत ठेवण्यात आलेला आहे
तरी या मेळाव्यास महाराष्ट्रातील विवाह इच्छुक वधुवरांनी पालकांसह व परिचय पत्रासह बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रा. नागनाथ बागल व करमाळा तालुक्याचे तालुका अध्यक्ष दिनेश मडके आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले आहे.
