शासकीय क्रिडा अनुदान योजनेचा लाभ घ्यावा-नरेंद्र पवार
करमाळा प्रतिनिधी:शासनाच्या खेळाडू व शिक्षण संस्थासाठी असलेल्या क्रिडा अनुदानाचा करमाळा तालुक्यातील खेळाडू व शिक्षण संस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूरचे नुतन जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले.करमाळा तालुक्यातील क्रिडा शिक्षकांची चालु वर्षी होणाऱ्या क्रिडा स्पर्धा संदर्भात गुरुवार,२७ रोजी सहविचार सभा कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा येथे आयोजित करण्यात आली होती या वेळी पवार बोलत होते.वेळी सहा.क्रिडाअधिकारी सत्येन जाधव, सुनिल धारुरकर ,नदीम शेख ,संयोजक मुकुंद साळुंके,क.आ.ज.विदयालयाचे नुतन मुख्याध्यापक सुनिल जाधव यांच्यासह तालुक्यातील क्रिडा शिक्षक उपस्थित होते.करमाळा तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धा पुढीलप्रमाणे : योगासने-८ आॉगस्ट बुद्धीबळ -११ ऑगस्ट म.गांधी विद्यालय ,करमाळा ,९ आॅगस्ट -व्हालीबाॅल भारत हायस्कूल जेऊर,कुस्ती -१८ ऑगस्ट १४ वर्ष मुले व सर्व गटाच्या मुली ,१९ ऑगस्ट -१७ ,१९ वर्ष वयोगट मुले , कबड्डी- डॉ.हेडगेवार विद्यालय गौंडरे २२ ऑगस्ट १४/१७/१९ सर्व गटाच्या मुली,२३ ऑगस्ट १४/१७/१९ वर्ष सर्व गटाची मुले ,क्रिकेट यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा -२४ ऑगस्ट सर्व गट मुले /मुली ,खो-खो -श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल कोर्टी व श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय वीट -२८ ऑगस्ट १४/१७/१९ वर्ष सर्व गटाच्या मुली,२९ ऑगस्ट १४/१७/१९ वर्ष सर्व गटाची मुले,मैदानी स्पर्धा -यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा,१ स्पटेंबर धावणे ,२ स्पटेंबर फेकी व उडया म.गांधी विद्यालय करमाळा
या प्रमाणे होतील .कबड्डी स्पर्धा या वर्षापासून तालुका स्तरापासून मॅटवर होतील . सर्व शाळांनी आॅनलाईन प्रवेशीका भराव्यात .प्रस्ताविक मुकुंद साळुंके यांनी केले तर सुत्रसंचलन बाळासाहेब भिसे यांनी केले व आभार जगदाळे यांनी मानले.
