करमाळा

मालवण राजकोट येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला झालेल्या दुर्घटनेच्या निषेधार्थ शिवभक्त मराठा बहुजन बांधव यांच्यावतीने करमाळयात जाहीर निषेध

करमाळा प्रतिनिधी
मालवण राजकोट रयतेचे राजे युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला झालेल्या दुर्घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाज व बहुजन बांधव आणि शिवभक्त यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सकल मुस्लिम समाज व दलित बांधव तसेच बहुजन बांधव यांच्या हस्ते करमाळा येथील छत्रपती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. व तहसील कार्यालय करमाळा येथे जाऊन तहसीलदार शिल्पाताई ठोकडे मॅडम यांना याबाबत निवेदन देण्यात आले.  राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ६ महिन्यात कोसळला असल्याने महाराष्ट्राची अस्मिता ढासळली आहे. शिवप्रेमींची मान शरमेने खाली जाईल असे कृत्य घडलेले आहे. त्यामुळे सदर घटनेस जबाबदार असलेले सबंधित विभागाचे अधिकारी, शिल्पकार, ठेकेदार यांच्यावर कठोर गुन्हा दाखल करावा व या निवेदनामध्ये सदर घटनेची सखोल तपासणी करून सदर दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावेळी शासनाचा जाहीर धिक्कार करून घोषणा देण्यात आल्या .यावेळी करमाळा शहर व तालुक्यातील शेकडो शिवभक्त यांनी रोष व्यक्त करुन शासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे.यावेळी शिवभक्त सकल मराठा समाज बांधव बहुजन बांधव मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group