कुर्डूवाडीतील 13 नगरसेवकांचा महायुतीचे उमेदवार मा.दिग्विजय दिगंबरराव बागल यांना जाहिर पाठींबा.
करमाळा प्रतिनिधी
कुर्डूवाडीतील 13 नगरसेवकांचा महायुतीचे उमेदवार मा.दिग्विजय दिगंबरराव बागल यांना जाहिर पाठींबा दिला आहे.
शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा शिवाजीराव सावंत यांचे मार्गदर्शनाखाली 36 गावांतून मताधिक्य मिळवून देण्याचा केला निर्धार केला आहे.भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष मा.रश्मी दिदीसाहेब बागल यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख मा. शिवाजीराव सावंत यांचा सन्मान करुन पदाधिकाऱ्यांचे व घटकपक्षांतील मान्यवरांचे अभिनंदन केले.
यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्या खंबीर व ध्येय्यवादी भूमिकेवर सर्वांनी विश्वास व्यक्त करत कुर्डूवाडीसह 36 गावांतून धनुष्यबाण चिन्हाला निर्णायक मतदान करून मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे जनतेचे सरकार सत्तेत आणू असा निर्धार केला आहे.
