Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे संबधित पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सक्रिय होण्याच्या सूचना

. करमाळा प्रतिनिधी गणेश चिवटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पुन्हा भाजपात सक्रिय होण्याचे आदेश आले आहेत, याबाबत अधिक माहिती अशी की, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांसह जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव,तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल,भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल पवार यांना पक्षविरोधी कारवाई बद्दल पक्षाने निष्कासित केले होते. आता ही कारवाई भाजपाचे प्रदेशाशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थगित करून सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय होण्याचे आदेश दिले आहेत, याबाबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारेजाहीर केले आहे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे म्हणाले की, आम्ही गेली वीस वर्षे भाजपाचे काम निष्ठेने केले आहे.या पुढील काळातही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,आ.चंद्रकांत दादा पाटील,माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमच्यावर विश्वास दाखवला व पुन्हा पक्ष संघटनेत सक्रिय केले याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत .राज्यात व केंद्रात भाजपा महायुतीची सत्ता आहे त्यामुळे येत्या काळात करमाळा तालुक्याच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर राहणार असून जास्तीत जास्त विकासनिधी आणणार आहोत असेही गणेश चिवटे यांनी शेवटी सांगितले,

 

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group