फिसरे गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे ग्रामस्थांनी केले अभिनंदन
फिसरे ता.करमाळा या गावात आरोग्य सुविधेचा अभाव असल्याने या गावातील नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी करमाळा, परंडा,बार्शी यासह बाहेर गावाला जावे लागत होते त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होते त्यामुळे अनेकांना वेळीच उपचार न मिळाल्याने प्राणास मुकावे लागले याची वेळीच गरज लक्षात घेऊन फिसरे गावातील नागरिकांना आपल्याच गावात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फिसरे गावचे विद्यमान सरपंच प्रदीप दौंडे, उपसरपंच संदीप नेटके ग्रामपंचायत सदस्य विजय आवताडे, हनुमंत रोकडे, यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे युवा नेते अजित दादा तळेकर, शिवसेना सोलापूर जिल्हा उपप्रमुख उद्योजक भरत भाऊ आवताडे यांच्या सहकार्याने फिसरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात येत आहे. यापुर्वी फिसरे गावचे सामाजिक कार्यकर्ते उद्योजक संदिप भाऊ नेटके यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र होण्यासाठी प्रशासनाकडे वांरवार मागणी केली होती या मागणीला यश आले असून फिसरे या गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले असून फिसरे गावातील नागरिकांची यामुळे चांगली सोय झाली आहे लवकरच फिसरे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे फिसरे गावातील नागरिकांच्या वतीने फिसरे गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे फिसरे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
