Tuesday, April 22, 2025
Latest:
ताज्या घडामोडीराजकीय

इंजिनिअरिंग ,फार्मसी व इतर विविध व्यवसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ.

 

प्रा.रामदास झोळ सर यांच्या पाठपुराव्याला यश.

प्रतिनिधी

प्रा.प्रविण अंबोधरे

 

इंजिनिअरिंग ,फार्मसी व इतर विविध व्यवसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, यासाठी असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अन्एडेड इन्स्टिट्यूटस इन रुरल एरिया संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष प्रा.रामदासजी झोळ सर यांनी राज्य सामाईक परिक्षा विभाग व सीईटी सेलचे आयुक्त यांच्याशी मुदतवाढ मिळावी यासंदर्भात मागणी केली होती व अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे,

 

पुढे बोलताना प्रा.झोळ सर म्हणाले की शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी २०२१ या प्रवेश परीक्षांकरिता आतापर्यंत ऑनलाईन अर्ज न केलेल्या उमेदवारांसाठी एक विशेष बाब म्हणून दिनांक १२/०८/२०२१ ते दिनांक १६/०८/२०२१ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी संधी देण्यात येत आहे.

 

तसेच या पुर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अर्जामधील दुरूस्ती करण्यासाठी दिनांक १४/०८/२०२१ ते १६/०८/२०२१ या कालावधील संधी देण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी http://mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी व या सुवर्ण संधीचा सीईटी पासुन वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे प्रा.झोळ सर म्हणाले तसेच सीईटी पासुन कुठलाही विद्यार्थी वंचित राहु नये यासाठी हि संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल राज्य सामाईक परिक्षा कक्षाचे देखिल आभार मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group