आपद्ग्रस्त कोकणावासियांना टायगर ग्रुपच्या वतीने मदतीचा हात
करमाळा प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कोकणात टायगर ग्रुप अध्यक्ष डॉ तानाजी भाऊ जाधव यांच्या आवाहणानंतर देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला असून या अभुतपुर्व मदतीने कोकणवासीय भारावून गेले आहेत.
कोकणातील महाड ,पोलादपूर, चिपळूण, तसेच सातारा ,कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील काही भागात महापुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे अपरिमित नुकसान झाले. अनेकांचे संसार उघड्यावर आले. नागरिकांची घरे,अन्नधान्य, तसेच जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या टायगर ग्रुप अध्यक्ष डॉ तानाजी भाऊ जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अतिवृष्टी ग्रस्त नागरिकांना मदत करण्याचे आवाहन करताच देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला असून प्रचंड प्रमाणात कार्यकर्ते मदत घेऊन कोकणात दाखल होत आहेत.
अहमदनगर टायगर ग्रुप अध्यक्ष बंटीभाऊ भिंगारदिवे,प्रवरा लोणी अध्यक्ष अण्णा भाऊ ब्राह्मणे,सैफ अली, सुहास मायकल ब्राम्हणे,,लोणी खुर्द अध्यक्ष मायकल ब्राम्हणे यांनी अपत्तीग्रस्तांना कपडे, अन्नधान्याचे वाटप केले.
मुसळधार पावसाने कोयना विभागतीलब मिरगाव, ढोकवळे, हुंबरळी, बाजे, गोकुळणाला येथे प्रचंड नुकसान झाले. कोयना विभागातील मुंबईस्थित गोकुळ येथील रहिवाशांनी या अपद्ग्रस्तांना मराठवाडा टायगर ग्रुपच्या नेतृत्वाखाली जीवनावश्यक वस्तू वाटप केले. तसेच येथे अन्नछत्र सुरू आहे.
धरणगाव टायगर ग्रुपच्या माध्यमातून कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना कृष्णा सुतार, अक्षय राजपूत, चेतन पाटील, कन्हैय्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाणी ,बिस्कीट,तसेच संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
बुलढाणा टायगर ग्रुपचे अध्यक्ष अमोलभाऊ राठोड, उपाध्यक्ष दिपकभाऊ खजुरे यांनी पूरग्रस्तांना 30 हजार रुपये रोख रक्कम तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
मुरबाड तालुका टायगर ग्रुपने अमिरभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. लातूर टायगर ग्रुप अध्यक्ष मयूर दादा गोरे यांच्या नेतृत्वाखाली पाणी, अन्नधान्य वाटप करण्यात आले.
चिंचवड टायगर ग्रुपच्या वतीने अभिजित भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली 10 चाकी ट्रक भरून अन्नधान्य, कपडे,पाणी आदी साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी अपद्ग्रस्त नागरिक म्हणाले की कोणतीही शासकीय मदत आमच्यापर्यंत पोहोचली नसताना टायगर ग्रुप आमच्या मदतीला धावून आला. डॉ तानाजी भाऊ जाधव यांचे सहकार्य नेहमीच कोकणवासीय स्मरणात ठेवतील.
अजूनही टायगर ग्रुपच्या माध्यमातून देशभरातील कार्यकर्ते मदत पाठवत असून कोकणातील जीवनमान पूर्वपदावर येईपर्यंत ही मदत सुरूच राहील असा विश्वास डॉ तानाजी भाऊ जाधव व्यक्त केला. आपल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व टायगर ग्रुप सदस्यांचे आभार मानले आहेत.
