विकासाच्या वाटा दाखविणारे लेखक. श्री. संतोष बिनवडे आणि श्री. गणेश सानप लिखित “सरपंच” हे पुस्तक दिशादर्शक ठरेल
केत्तुर प्रतिनिधी- मौजे केत्तुर येथिल रहीवाशी पत्रकारिता क्षेत्रात पुणे येथे कार्यरत असणाऱ्या लेखिका सौ. भावना बाठीया- संचेती यांनी ग्रामपंचायत केत्तुर येथे दिपावली पाडव्याच्या मुहुर्तावर लेखक संतोष बिनवडे व गणेश सानप यांनी लिहीलेल्या सरपंच या पुस्तकाचे दिपावली भेट स्वरूपात वितरण केले.. या प्रसंगी सरपंच विलास कोकणे, माजी सरपंच उदयसिंह मोरे- पाटील, माजी सरपंच, अॅड अजित विघ्ने, माजी सरपंच, सुहासशेठ निसळ, माजी उपसरपंच व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जरांडे, ग्रा.पं. सदस्य लक्ष्मण खैरे, जयकुमार बाठीया, हर्षकुमार बाठिया, पत्रकार राजाराम माने, संतोष ऊर्फ पिंटु कानतोडे, अजिनाथ कनिचे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते… यावेळी सरपंच या पुस्तकातुन कंदर.ता- करमाळा गावच्या सरपंच सौ. मनिषाताई भांगे यांचेसह महाराष्ट्रातील अनेक जिल्हयातील सरपंचानी केलेल्या विकासकामांची माहीती व त्या अनुषंगाने आपल्याही गावागावात कोणत्या आणि कशा योजना राबविता येतील आणि गावे समृद्ध होतील याबाबतची सविस्तर माहीती देऊन, लेखकांचा परिचय देखिल देण्यात आला.. यावेळी लेखक संतोष बिनवडे यांनी अमेरिकेतुन व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे या कार्यक्रमात सहभाग नोंदविला आणि उपस्थितांचे आभारही मानले… लेखक संतोष बिनवडे हे सध्या अमेरिकेतील एका उच्चभ्रु कंपनीत मॅनेजरपदी कार्यरत असुन, त्यांचा वंजारवाडी ता- करमाळा ते अमेरिका हा प्रवास थक्क करणारा आहे. अतिशय हालाखीचे परिस्थितीतुन कष्ट करून त्यानी शिक्षण घेतले.. लागेल ती कामे करून त्यांनी स्वतःला सिद्ध केले.. आज ते अमेरिकेत जरी असले तरी त्यांना खेड्याविषयी , ग्रामिण भागाचे कुतुहुल आहे.. डिजिटल भारतात आज देखिल शहरे फुगत चालली असुन खेडी ओस पडत आहेत.. त्यामुळे खेडी सुधारली तरच देशाचा खरा विकास होईल या विचाराने त्यांनी महाराष्ट्रातील आकरा निवडक सरपंचाचे कामांचा सरपंच पुस्तकातुन आढावा घेतलेला आहे.. आजही खेडोपाडी रस्ते, पाणी, शौचालय, वीज याबाबत समस्या आहेत, याबाबत अजुनही खेडी स्वयंपूर्ण नाहीत, खेडयात अजुनही रोजगार आणि शिक्षणाचे प्रश्न आहेत.. यासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, नागरिक यांनी राजकारण विरहीत एकत्रित येऊन आपल्या गावाला समृद्ध कसे करता येईल याबाबत चे मार्गदर्शन , माहीती या पुस्तकातुन मांडली आहे.. या वेळी लेखिका सौ. भावना बाठीया संचेती यांचा ग्रामपंचायत केत्तुर यांचे वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
