करमाळासहकार

श्री.आदिनाथ साखर कारखाना यंदा यशस्वी गाळप करणार बाॅयलर प्रदिपण संमारंभ दिमाखात संप्पन

करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखाना तालुक्यातील शेतकऱ्यांचे सहकाराचे मंदिर असून हा कारखाना चालू करण्यासाठी बागल व पाटील गट एकत्र आला असुन इतर कारखान्याच्या बरोबरीने भाव देणार असून कारखान्याला ऊस घालून सहकार्य करावे कारखाना यशस्वीपणे चालवुन पुन्हा गतवैभव मिळून देण्यासाठी आम्ही कार्यरत राहू असे मत बागल गटाच्या नेत्या आदिनाथ साखर कारखाना संचालिका सौ. रश्मी दीदी बागल यांनी व्यक्त केले.बाॅयलर अग्नि प्रदिपनाचे पूजन ह.भ.प. श्री. रामभाऊ महाराज निंबाळकर आणि ह. भ.प. श्री. विठ्ठल महाराज पाटील, शेटफळ यांच्या शुभहस्ते व श्री सत्यनारायण महापूजा कारखान्याचे संचालक अविनाश वळेकर व
त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते संप्पंन झाले
आदिनाथच्या या वर्षीचा चालू गळीत हंगाम 2022-23 च्या बाॅयलर पूजनासाठी बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल आणि पाटील गटाचे नेते नारायण आबा पाटील उपस्थित होते. कारखान्यामधील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे यावर्षी होणारा ऊस गळीत हंगाम चांगल्याप्रकारे यशस्वी होईल असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे. यावेळी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला सर्वांनी सहकार्य केल्यास आदिनाथ कारखाना नक्कीच सोन्याचा धूर काढल्याशिवाय राहणार नाही असे मत व्यक्त केले. आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी बागल गट व पाटील गट एकत्र आला असून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी कारखाना चालु करण्यास सहकार्य केले असून आदिनाथ सहकारी कारखाना चालवण्यासाठी सर्वतोपरी सहकारी मिळणार आहे .यासाठी शेतकरी सभासदांनी आदिनाथ कारखान्यालाच ऊस घालून सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले. या बॉयलर अग्निप्रदिपण समारंभाला चेअरमन धनंजय डोंगरे व्हा.चेअरमन रमेश कांबळे,उपस्थित. रश्मी बागल, नारायण पाटील, ह. भ. प. रामभाऊ महाराज निंबाळकर, ह. भ. प. विठ्ठल महाराज पाटील,  नितीन जगदाळे, माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे, डाॅ. वसंत पुंडे, शहाजीराव देशमुख, शिवाजीराव बंडगर, संचालक डाॅ. हरिदास केवारे, प्रकाश झिंजाडे, नामदेव भोगे, पांडूरंग जाधव, लक्ष्मण गोडगे, अविनाश वळेकर, चंद्रहास निमगिरे, नानासाहेब लोकरे, दिलीप केकाणे, पोपट सरडे, रामभाऊ पवार, सचिन पांढरे, राजेंद्र पवार, माजी संचालक भारत साळुंखे, आबासाहेब डोंगरे, दत्तात्रय जाधव, जयप्रकाश बिले, विकास गलांडे, दिनकर सरडे, भागवत पाटील, दादासाहेब पाटील, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, शेखर गाडे, गणेश तळेकर,संतोष देशमुख,बापु कदम,अजिनाथ फरतडे, विजय रोकडे, ॲड. देशपांडे, कल्याण सरडे, लक्ष्मण केकान, रामभाऊ शिंदे, संजय गुटाळ, त्रिंबक पोळ, कार्यकारी संचालक अरुण बागनवर, कार्यालय अधीक्षक एम. एस. कदम, इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रल्हाद आटोळे, चीफ केमिस्ट अशोक खाडे, चीफ अंकौटट सतिश पोळ, सुनिल बोराडे, डि. चीफ इंजि दिपक देशमुख, शेतकी अधिकारी दिपक खटके, सिव्हिल इंजिनिअर एस. के. अंभग, सुरक्षा विभागाचे विष्णुदास शिंदे, परचेसचे रविंद्र कदम, उद्देश पाटील यांच्या सह पदाधिकारी, सभासद, कर्मचारी उपस्थित होते...

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group