करमाळा शहरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात आनंदात साजरा
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर व पंचक्रोशीत हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.शहरातील भवानी पेठ..सावंत गल्ली..भाजी मंडई..किल्ला विभाग..मंगळवार पेठ या मंदिरांमध्ये हरीनाम सप्ताहासोबत इतर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.भाविक भक्त नागरीकांना महाप्रसाद देण्यात आला. सायंकाळी सालाबादप्रमाणे बाहेर तालीम तरूण मंडळाच्या वतीने हनुमान मुर्तीचा छबिणा मिरवणुक उत्साहात काढण्यात आली.यावेळी पुणे येथील प्रसिद्ध ”जॅग्वार म्युझिक” डिजे सिस्टिम सोबत बहुसंख्य उत्साहि युवक मिरवणुकीत सहभागी झाले होते.पोलिस प्रशासनाच्या सुचनांचे पालन करीत मंडळाने यंदा गुलाल न उधळता छबीणा मिरवणुक पार पाडली.यावेळी पोलिस उपनिरीक्षक प्रविण साने व इतर पोलिस कर्मचारी बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
