Monday, April 21, 2025
Latest:
करमाळा

केत्तुर येथे निर्भया पथकाने एका महिन्यात दुसऱ्यांदा कारवाई केल्याने रोडरोमिओमध्ये दहशत

केत्तूर (अभय माने) केत्तूर (ता. करमाळा) येथील नेताजी सुभाष विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे निर्भया पथकाने एका महिन्यात दुसऱ्यांदा कारवाई केल्याने रोडरोमिओ मध्ये दहशत पसरली आहे.

गेल्या महिन्यात एका विद्यार्थिनींने व तिच्या पालकांनी करमाळा येथे जाऊन रोड रोमिओ वव विद्यार्थिनींना वारंवार त्रास देणाऱ्या विरुद्ध तक्रार दिली होती या तक्रारीची तात्काळ दखल घेत निर्भय पथकातील सदस्यांनी कारवाई केली होती त्यानंतर सोमवार (ता. 12 ) रोजी निर्भया पथकाने पुन्हा एकदा अचानकपणे विद्यालय परिसरात धडक कारवाई करत शाळा परिसर व रस्त्यावर मोकाट,विनाकारण फिरणाऱ्या तरुणावर कारवाई केली व त्यांना ताब्यात घेण्यात आले व चौकशी करून समज देऊन सोडून देण्यात आले.निर्भया पथकाचे स्वागत प्राचार्य दिलावर मुलांनी यांनी केले. निर्भय पथकाच्या सर्तकेमुळे परिसरातील पालकांनी समाधान व्यक्त केले आहे तर विद्यार्थिनींना विनाकारण त्रास देणाऱ्या रोडरोमिओवर मात्र दहशत पसरली आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भय पथकातील पोलीस कर्मचारी सदस्य पाडुळे,गायकवाड,गर्जे,पवार यांनी सदरची कारवाई पार पाडली.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group