करमाळा

माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे बिटरगाव श्री येथील अनेक दिवसांपासून रखडलेले कॅनलचे काम सुरु…


करमाळा प्रतिनिधी
बिटरगाव श्री येथील अनेक दिवसांपासून रखडलेले कॅनलचे काम सुरु झाले आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे या कामासाठी निधी मिळाला होता. या कामामुळे साधारण ८० हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. करमाळा पाटबंधारा विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश बाबा, कालवा निरीक्षक अतुल दाभाडे, बाळासाहेब घाडगे आदींच्या उपस्थितीत पोलिस पाटील भूषण अभिमन्यू व प्रगतशील शेतकरी विकास मुरूमकर यांच्या हस्ते या कामाचे आज (बुधवार) भूमिपूजन झाले.
मांगी तलावातील डाव्या कालव्यातून बिटरगावच्या कॅनलला पाणी येते. कामोणे येथून येणाऱ्या ओढ्यावर बिटरगाव श्री हद्दीत नंदकुमार दळवी यांच्या घरामागे कॅनल क्रॉस होतो. त्यासाठी जुन्या पद्धतीचे सायपण (दोन्ही बाजूला विहिरी घेऊन मध्ये सिमेंट नळ्या टाकणे) होते. मात्र तेच लिकेज झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीतून कॅनल जाऊन देखील पाणी मिळत नव्हते. त्यामुळे माजी आमदार शिंदे यांच्याकडे शेतकऱ्यांनी निधीची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी जलसंपदा विभागाकडे आमदार असताना पाठपुरावा केला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याला निधी मिळाला होता. मात्र टेंडर प्रक्रिया व इतर कायदेशीर प्रक्रिया राहिली होती. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर आता हे काम सुरु झाले आहे. या उन्हाळ्यात यातून पाणी मिळेल, अशी अशा शेतकऱ्यांना आहे. भूमिपूजनावेळी रवींद्र दळवी, प्रमोद शिंदे, सुरेश दळवी, संदीप दळवी, मानेश मुरूमकर, हरीप्रसाद दळवी, अशोक मुरूमकर उपस्थित होते.

चौकट –
माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली जवळपास 1000 कोटींची कामे सध्या तालुक्यात प्रगतीपथावर…
आमदार शिंदे यांनी करमाळा तालुक्यासाठी 3490 कोटी असा भक्कम निधी मिळवला होता. परंतु 5 वर्षातील राजकीय अस्थिरतेमुळे प्रत्यक्षात अनेक कामे सुरू झालेली नव्हती. याच मुद्द्यावरून विरोधकांनी रान उठवून हा कागदोपत्री विकास आहे असा हल्लाबोल केला होता, परंतु मतदारांना शिंदे यांच्या विकास कामांची प्रचिती सध्या येत आहे. सध्या संजयमामा शिंदे माजी आमदार असले तरीसुद्धा त्यांनी मंजूर केलेली 1 हजार कोटींची कामे सध्या तालुक्यात प्रगतीपथावर आहेत. यामध्ये 71 किलोमीटर लांबीचा नव्याने तयार होणारा हॅम रस्ता, राजुरी सबस्टेशन ,रावगाव सबस्टेशन, करमाळा येथील सहाय्यक निबंधक कार्यालय इमारत बांधकाम, करमाळा उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकाम, करमाळा उपजिल्हा कर्मचारी व अधिकारी निवासस्थान बांधकाम,करमाळा शहरांतर्गत रस्ते, करमाळा ग्रामीण भागातील रस्ते ,डिकसळ पूल, जलसंधारण विभागांतर्गत तलाव दुरुस्ती, दहिगाव उपसा सिंचन बंद नलिका , प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आदी कामे वेगात सुरू आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group