करमाळा

करमाळा विधानसभा मतदारसंघातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत तातडीने बैठक घेऊन 40 गावांचा प्रश्न सोडवण्याची गणेश कराड यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

करमाळा प्रतिनिधी करमाळा विधानसभा मतदारसंघातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत तातडीने बैठक घेऊन करमाळा तालुक्यातील 40 गावांचा प्रश्न सोडवण्याची मागणी भाजप प्रदेश सचिव गणेश भाऊ कराड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.            .महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकनेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांची मुंबई येथे भेट घेऊन कारमाळा विधानसभा मतदारसंघातील रिटेवाडी उपसासिंचन योजने बाबत सरकारने तातडीने शासकीय बैठक घेऊन करमाळा तालुक्यातील ४० गावांची तहान भागवून द्यावी अशी मागणी केली.तसेच पांडे व पोंधवडी ग्रामपंचाय हद्दीतील विविध विकास कामासंदर्भात पत्र देऊन पुढील कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळ कारवाई करुन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे  गणेश भाऊ कराड यांनी सांगितले आहे.

 

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group