करमाळा

रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी 47 लक्ष निधी मंजूर केम उपसा सिंचन योजना व पांढरेवाडी उपसा सिंचन योजना सर्वेक्षणासाठी लवकरच निधी उपलब्ध होणार- रश्मी बागल

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप प्रवेशावेळी कुठलीही अट न ठेवता फक्त माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यासाठी रीटेवाडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करावी अशी एकमेव अट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे ठेवली होती.त्याची सकारात्मक दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाकडून कृष्णा खोरे महामंडळाला ४७ लाख रुपयाचे वितरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.अशी माहिती भाजपा महीला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदि बागल यांनी बोलताना दिली.

यावेळी बागल यांनी अधिक बोलताना सांगितले की दहीगाव उपसा सिंचन योजना ही युती सरकारच्याच काळात स्व.दिगंबरराव बागल मामा यांनी मंजूर करुन आणली आणि ८०%काम पूर्ण केले.त्यामुळे ही योजना पूर्व भागात सद्या कार्यान्वित आहे.परंतू करमाळा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रातील गावांना कुकडी चे पाणी पूर्ण दाबाने मिळत नव्हते.त्यामुळे हे पाणी उजनी जलाशयात नदीद्वारे सोडून रीटेवाडी उपसा सिंचन योजना करण्याची मागणी केली होती.यासंदर्भात करमाळा तालुक्यातील चाळीस गावातील सरपंच यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूर येथे बैठक घेतली होती. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी मा. देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.

चौकट.
केम वडशिवणे उपसा सिंचन योजना तसेच पांढरेवाडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या शी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच या दोन्ही योजनांच्या सर्वेक्षणाचे आदेश देऊन निधीची तरतूद करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group