करमाळा तालुक्यातील कावळवाडी गावाच्या विकासकामासाठी भरघोस निधी देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे भाजप प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांचे निवेदन*
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील कावळवाडी या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापूर जिल्हा पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे कावळवाडी गावातील विविध विकास कामांची मागणी राज्य साखर संघाच्या संचालिका, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा आदरणीय रश्मी दिदी बागल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मकाईचे मा चेअरमन भाजप युवा नेते दिग्विजय बागल मकाई संचालक आशिष गायकवाड उपस्थित होते. या निवेदनावरून दखल घेत पालकमंत्री ना चंद्रकांत दादा पाटील यांनी जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना आदेश दिले आहेत.कामांना जिल्हा नियोजन मंडळातून (DPC) योजनेतुन मंजुरी देवून आर्थिक तरतूद होणेबाबत आपले स्तरावरुन संबंधितांना आदेश व्हावेत.असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनात कावळवाडी विकासासाठी.मौजे कावळवाडी येथील श्री पांडुरंग मंदिर ते गोसावी वस्तीपर्यंत खडीकरण व मुरुमीकरण करणे अंदाजे अंतर १.५ कि.मी
मौजे कावळवाडी येथील श्री पांडुरंग मंदिर ते श्री मस्कोबा मंदिर १०.००खडीकरण व मुरुमीकरण करणे अंदाजे अंतर ५०० मिटर,मौजे कावळवाडी येथील श्री मस्कोबा मंदिर येथे सभामंडप १०.०० बांधणे
मौजे कावळवाडी श्री पांडुरंग मंदिर ते श्री महादेव मंदिर (करपडी १५.००शिव) खडीकरण व मुरुमीकरण करणे अंदाजे २.५ कि.मी,मौजे कावळवाडी गाव ते मारुती मंदिर (मानेवाडी शिव) १५.००,खडीकरण व मुरुमीकरण अंदाजे अंतर २.५ कि.मी,मोजे कावळवाडी येथील श्री पांडुरंग मंदिर ते मरीमाता मंदिर ८.००
खडीकरण व मुरुमीकरण करणे अंदाजे अंतर ७०० मिटर,मौजे कावळवाडी येथील जिल्हा परीषद शाळेपासुन स्मशानभुमी १०.०० रस्ता खडीकरण व मुरुमीकरण करणे अंदाजे १ कि.मी या विकास कामाचा समावेश आहे. कावळवाडी विकासासाठी रश्मी दीदी बागल दिग्विजय बागल यांनी नेहमीच झुकते माप दिले असुन कावळवाडी गाव विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केल्याबद्दल मकाई संचालक रामभाऊ हाके कावळवाडी ग्रामपंचायत सरपंच व समस्त ग्रामस्थ यांनी त्यांचे आभार मानून अभिनंदन केले आहे.
