कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लो पाणी व उजनी धरण 33% भरल्यानंतर दहिगाव उपसा योजना सुरू करण्याची आमदार संजयमामा शिंदे यांची मागणी
करमाळा प्रतिनिधी
2023 मध्ये करमाळा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती.2024 मध्ये अजूनही करमाळा तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही.उजनी धरण ही मायनस मध्येच होते, परंतु सध्या उजनी धरणामध्ये पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग 1 लाखापेक्षा अधिक असल्यामुळे उजनी धरण मायनस मधून प्लस मध्ये आले आहे ते लवकरच 33% ही भरेल त्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजना तात्काळ सुरू करावी तसेच कुकडी प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्या पाण्यामधून करमाळा तालुक्याच्या लाभक्षेत्रातील गावे व मांगी तलावात पाणी सोडण्याची मागणी आमदार संजयमामा शिंदे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्याकडे केलेली आहे.
सदर निवेदन निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,माझे करमाळा विधानसभा मतदारसंघात गेल्यावर्षी दुष्काळ असल्यामुळे तीव्र पाणीटंचाई होती. यावर्षीही अत्यल्प पाऊस असल्यामुळे अद्याप पाणीपातळीत वाढ झालेली नाही. तरी कुकडी प्रकल्पाचे ओव्हर फ्लोचे पाणी करमाळा तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावात व मांगी तलावात सोडण्यात यावे. तसेच उजनी धरण 33% भरल्यानंतर तात्काळ दहिगाव उपसा सिंचन योजना सुरू करणे संदर्भात आपले स्तरावरून संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत ही विनंती.
चौकट…
29 जुलैला दहिगाव उपसा सिंचन योजनेसंदर्भात आढावा बैठक…
सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजता आमदार संजयमामा शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत दहिगाव उपसा सिंचन योजनेची आढावा बैठक दहिगाव येथील पंपगृह येथे आयोजित केली आहे. सदर बैठकीसाठी हायड्रो, मेकॅनिकल व सिव्हिल या तिन्हीं विभागांचे अधिकारी त्यांच्या स्टाफ सह उपस्थित राहतील.
